पर्यटन खात्यातर्फे आज ‘विवा सांजाव’

0
4

गोवा पर्यटन खात्याने शनिवार दि. 24 जून रोजी ‘विवा सांजाव’चे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत दावली-एला येथील हेलिपॅडवर होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार गणेश गावकर, आमदार राजेश फळदेसाई, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार वीरेश बोरकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पर्यटन सचिव संजीव आहुजा, पर्यटन संचालक सुनील आंचिपाका हे हजर असतील.