पर्यटन खात्याकडून ३७८ शॅक्स उभारण्यास मान्यता

0
119

पर्यटन खात्याने काल बुधवारी सोडतींद्वारे राज्यभरातील समुद्र किनार्‍यांवर ३७८ शॅक्स उभारण्यास मान्यता दिली. त्यापैकी २७० शॅक्स हे उत्तरेतील किनार्‍यांवर तर १०८ शॅक्स हे दक्षिणेतील किनार्‍यांसाठी असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली.
३७८ शॅक्सपैकी ९० टक्के शॅक्स हे ज्यांना शॅक्स व्यवसायाचा ३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे अशा व्यावसायिकांना देण्यात आले असल्याची माहिती मंत्री आजगावकर यांनी दिली.

शॅक्सचे वितरण करण्यास महिन्याभराचा विलंब लागला असल्याने शॅक्स व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. आता त्यांना शॅक्स उभारण्यास मान्यता देण्यात आलेली असली तरी हे शॅक्स उभारण्यास आणखी किमान ११ दिवस लागणार असल्याचे शॅक्स व्यावसायिक लोकांचे म्हणणे आहे. पर्यटन खात्याने १७ ऑक्टोबर रोजी शॅक्सचे वितरण करण्याची सगळी तयारी केली होती. मात्र प्रकरण उच्च न्यायालयात असल्यामुळे ते वितरण रद्द करावे लागले असे मंत्री आजगावकर यांनी यावेळी सांगितले.