पर्यटकांसाठी ऍम्फिबियन वाहने सेवेत दाखल

0
63

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते काल खास पर्यटकांच्या सेवेसाठी आणलेल्या सुमारे अडीच कोटी रुपये किमतीच्या पाण्यात व जमिनीवरही चालणार्‍या एम्फिबियन वाहनांचा काल शुभारंभ करण्यात आला.

फेरी धक्क्याजवळ खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल व अन्य उपस्थित होते. सुमारे २० प्रवाशांची सोय असलेले हे अत्याधुनिक वाहन कालपासून पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी आधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अशा प्रकल्पांचा पर्यटन विकासाला फायदा होईल, असे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले.