गेल्या काही महिन्यात कळंगुट भागात एक टोळी वावरत होती. या टोळीने आजपर्यंत पर्यटकांना लुबाडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. याप्रकरणी कळंगुट पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून होते. काल दुपारी पोलिसांनी सापळा रचून टोळीतील दोघांना शिताफीने अटक केली.
कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर इतर पोलीस हवालदार गोविंद फटनाईक, अशोक गावडे, विष्णू राणे, सुमीत मुरकर यांनी काल बागा-कळंगुट येथे श्रीधर मूर्ती (२१) म्हैसूर व राहुल पटेल (२२) मध्यप्रदेश या युवकांना सापळा रचून पकडण्यात यश मिळविले. यापूर्वी कृष्णा लमाणी या युवकाला पकडण्यात यश आले होते.