पणजीसाठी उमेदवार निवडीबाबत कॉंग्रेससमोर पेच

0
79

फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता असलेल्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला टक्कर देण्याची क्षमता असलेला एकही उमेदवार सध्या कॉंग्रेसला सापडत नसल्याने कॉंग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. गेल्या वीस वर्षांच्या काळात हा मतदारसंघ कॉंग्रेसला मिळालेला नाही. एजिल्डा सापेको यांनीही आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, सांताक्रुजचे आमदार बाबुश मोन्सेर्रात कोणता निर्णय घेतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या भूमिकेवर बरेच काही अवलंबून असल्याचे सांगण्यात येते.