कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे बंद करण्यात आलेले पणजीतील मासळी मार्केट आज सोमवारपासून खुले करण्यात येणार आहे. काल रविवारी यासंबंधीची माहिती देताना पणजी महापालिकेच्या बाजार समितीचे अध्यक्ष प्रमेय माईणकर म्हणाले की, आम्ही आज सोमवारपासून पणजीतील बंद असलेले मासळी मार्केट खुले करणार आहोत. मात्र, हे मार्केट सध्या सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंतच खुले ठेवण्यात येणार आहे. मासळी खरेदी करण्यासाठी येणार्या ग्राहकांना कोरोना एसओपीचे पालन करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेशी नोंदणी केलेल्या ३०६ मच्छीमारांनाच मार्केटमध्ये प्रवेश असेल, असे ते म्हणाले. पणजीतील भाजी व फळ मार्केट यापूर्वीच खुले करण्यात आलेले असून एकावेळी केवळ १५ जणांनाच आत सोडण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.