पणजीचे उमेदवार आज स्पष्ट होणार

0
90

पणजी मतादरसंघासाठी येत्या १३ रोजी होणार्‍या पोटनिवडणुकीतील उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपणार असून त्यामुळे या निवडणुकीत किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील हे आज दुपारी स्पष्ट होईल.सध्या भाजपचे सिद्धार्थ कुंकळकर, कॉंग्रेसचे सुरेंद्र फुर्तादो व कूळ व मुंडकारांचा प्रश्‍न घेऊन पुढे आलेले सदानंद वायंगणकर व अपक्ष समीर केळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. कुंकळकर यांचे प्रचारकार्य बर्‍याच दिवसांपासून सुरू असून फुर्तादो यांनीही वेगवेगळ्या भागात जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. काल कॉंग्रेस भवनात फुर्तादो यांचा जाहीरनामा प्रकाशित झाला. त्यावेळी तेथे एकही नगरसेवक नव्हता. महापालिकेचे नगरसेवक कोणत्या उमेदवारासाठी प्रचार करणार त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.