पंतप्रधान मोदी – शी जिनपिंग १५-१६ रोजी भेटण्याची शक्यता

0
22

येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समरकंद दौर्‍यासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेसाठी मंच तयार केला जाणार आहे. ज्यामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार असून यावेळी मोदी व शिनपिंग यांची भेट होण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका निवेदनात चीन आणि भारत या दोन्ही देशांनी परिसरात बांधलेल्या सर्व तात्पुरत्या संरचना आणि इतर संबंधित पायाभूत सुविधा नष्ट केल्या जाण्यास मान्यता दिली आहे. तसेच या भागाची परस्पर पडताळणी केली जाईल असे म्हटले आहे. भारत आणि चीनच्या सैन्याने गोगरा-हॉटस्प्रिंग्स परिसरातून माघार घेण्याचे मान्य केले आहे. दोन्ही सैन्य १२ सप्टेंबरपर्यंत या भागातून पूर्णपणे बाहेर पडतील. मात्र या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. स्थानिक लष्कर कमांडर आणि अधिकार्‍यांना प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. सैन्याच्या हालचालींचीही पडताळणी केली जात आहे.
संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडावी आणि परिसरात तणाव वाढू नये, अशा सूचनाही कमांडरना दिल्या आहेत. जून २०२० मधील गलवान संघर्ष लक्षात घेऊन, या संपूर्ण प्रक्रियेमागील हेतू हा आहे की आता कोणतीही अनुचित घटना घडू नये. मात्र, सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याबाबत अद्याप चर्चा होणे बाकी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.