येत्या भारतीय प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे भारताने दिलेले निमंत्रण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वीकारले आहे.२०१५च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांना निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण स्वीकारण्यात आल्याचे पत्रक व्हाईट हाऊसने जारी केले आहे. मोदी यांच्या निमंत्रणानुसार ओबामा प्रजासत्ताक दिन सोहळ्यात उपस्थित राहण्यास भारतात येणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. ओबामा या दौर्यावेळी पंतप्रधान मोदी व भारतीय अधिकार्यांना भेटतील व उभय देशां दरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीला बळकटी येईल असेही पत्रकात नमूद केले आहे. याआधी ओबामा २०१० साली भारताच्या दौर्यावर आले होते.