वाघ बैठकीस उपस्थित राहत नाहीत : तेंडुलकर

0
77

पक्ष बैठकीचे निमंत्रण दिले जाते
भाजपचा सदस्य किंवा आमदार पक्षाच्या बाबतीत स्वतंत्र असा असूच शकत नाही. पक्ष म्हणूनच महत्वाचा असतो. विष्णू सूर्या वाघ यांना पक्षाच्या बैठकीला बोलावले जाते. परंतु ते उपस्थित राहात नसल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले.वाघ यांनी पक्षाला काहीही सांगितलेले नाही असे ते म्हणाले. युतीचे आमदार असलेले मंत्री दीपक ढवळीकर यांनी कमी महत्व असलेली खाती दिल्याने प्रियोळ मतदारसंघातील त्यांचे समर्थक व मतदार नाराज बनले आहेत, यावर प्रतिक्रिया विचारली असता, खाते वाटपांकडे पक्षाचा संबंध नाही. तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, असे ते म्हणाले.