‘आप’चे नेते धीर  यांचा भाजपात प्रवेश

0
80

आम आदमी पक्षाचे माजी आमदार तथा दिल्लीचे माजी सभापती मनिंदरसिंग धीर यांनी काल भाजपात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यामुळे धीर व ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान भारताचा माजी डेव्हिस चषक कर्णधार रोहित राजपाल यानेही भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशानंतर धीर यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली देश प्रगतीपथावर येत असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. याआधी ‘आप’मध्ये येण्याआधी आपण भाजपात होतो असेही त्यांनी स्पष्ट केले.