पंतप्रधान मोदींकडून खेद व्यक्त

0
93

निरंजन ज्योती प्रकरण
केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत निवेदन करून खेद व्यक्त केला. निरंजन यांच्या वक्तव्याचा मोदी यांनी निषेधही केला. त्याचबरोबर निरंजन या नवख्या असल्याने व त्यांनी माफीही मागितली असल्याने त्यांना दिलदारपणाने माफ करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. मात्र विरोधकांनी ते धुडकावीत कामकाज चालू ठेवण्यासही विरोध केला. ‘अशा प्रकारच्या भाषेस कोणाचीही मान्यता नसते. त्यांनी माफी मागितली आहे. त्या नवीन आहेत आणि त्यांच्या ग्रामीण पार्श्‍वभूमीचीही आपल्याला जाणीव आहे. त्यामुळे हा विषय आता थांबायला हवा’ असे मोदी म्हणाले.मात्र त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. तसेच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तृणमूल कॉंग्रेस व अन्य नेत्यांच्या साथीने संसदेबाहेर निरंजनप्रकरणाचा निषेध केला. हा सर्व प्रकार म्हणजे या सरकारच्या मनोवृत्तीचा भाग असल्याचे निदर्शक असल्याचा दावा त्यांनी केला.