पंजाबमध्ये अकाली दल अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला

0
73

पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यानंतर कॉंग्रेस व अकाली दलाचे कार्यकर्त्यांची एकमेकांत तुफान हाणामारी झाली. यावेळी एकमेकांवर दगड-विटा फेकण्यात आल्या. तसेच यावेळी गोळीबारही झाला.

जलालाबादमध्ये सोमवारी काल कॉंग्रेस व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणारी झाली होती. काल मंगळवारी अकाली दलाचा उमेदवार अर्ज दाखल करणार होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल हे तिथे पोहोचले त्यांच्या वाहनाावर जोरदार दगडफेक सुरू झाली. याच दरम्यान गोळीबारदेखील केला गेला.