न्हावेली खूनप्रकरणी ३ अटकेत : शस्त्रे जप्त

0
91

न्हावेली, साखळी येथील जमेदार रेहमान या मजुराच्या खूनप्रकरणी डिचोली व वाळपई पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला असून या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयितांनी वापरलेली धारदार शस्त्रे पोलिसांनी काल जप्त केली. मृत व्यक्तीचे शरीराचे तिन्ही तुकडे गोळा करून शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठविले आहेत. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक भांडणातून खून झाल्याचा संशय आहे. दरम्यान, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, संदेश चोडणकर, सागर एकोस्कर, सुदेश नाईक, निरीक्षक दत्तगुरू सावंत, संजय दळवी, गुरुदास गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

न्हावेली येथील मोहित इस्पातच्या बाजूलाच असलेल्या झाडीत रेहमानच्या शरिराचे तीन तुकडे सडलेल्या अवस्थेत तीन ठिकाणी पोलिसांना सापडले होते. तो १५ सप्टेंबरपासून बेपत्ता होता.