न्या. कर्णन यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

0
60

न्यायालयाच्या अवमानप्रकरणी तुरुंगवास सुनावण्यात आलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्णन यांनी ही शिक्षा रद्द ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने याप्रकरणी लक्ष घालण्यास मान्यता दिली आहे.
न्या. कर्णन यांचे वकील जे. नेडुम्पारा यांना न्यायालयाने कर्णन कोठे आहेत असे विचारले. त्यावेळी ते चेन्नईत असल्याचे नेडुम्पारा यांनी सांगितले. १२ वकिलांनी कर्णन यांचे प्रतिनिधीत्व करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.