‘ती’ ३० टक्के मते पुन्हा पक्षाकडे आणणार ः पर्रीकर

0
57

>> पणजीतूनच निवडणूक लढविण्याची होती तयारी

आपण पणजी मतदारसंघातूनच विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा विचार केला होता. भाजपपासून दूर गेलेली पणजीतील ३० टक्के मते आपण परत पक्षाकडे आणणार असल्याचे सांगून आपल्या विरुद्ध कोणता उमेदवार निवडणूक लढवणार त्याची आपल्याला ङ्गिकीर नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

गोव्यातील सध्याचे आघाडी सरकार सुरळीत चालत आहे. ते ‘डिस्टर्ब’ करण्यास आपण तयार नाही, आपण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री आहे, असे सांगून पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांना पंचायत निवडणुकीनंतर दुसरे खाते देणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. सध्या सरकारने विकासकामांवर भर दिला आहे. नवा मांडवी पूल मार्च २०१८ मध्ये खुला होणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
दरम्यान, आघाडी सरकार सुरळीत चालल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी सरकारमधील भाजप आमदारांना व कार्यकर्त्यांना सध्याचे सरकार आपले असे वाटत नाही अशी सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे पक्षात या विषयावर नाराजी पसरल्याचे कळते. बुधवारी रात्री झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत या प्रश्‍नावर खडाजंगी झाल्याचेही वृत्त आहे.