Home बातम्या नौदलाच्या ताफ्यात लवकरच राफेल सागरी लढावू विमाने

नौदलाच्या ताफ्यात लवकरच राफेल सागरी लढावू विमाने

0

भारतीय नौदलाला लवकरच 26 राफेल सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत. भारताने फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली असल्यामुळे 63 हजार कोटी रुपयांचा हा करार लवकरच होणार आहे. 26 राफेल मरीन जेट विमानांच्या खरेदीबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. 2016 मध्ये हवाई दलासाठी 36 विमाने खरेदी करताना ठेवलेल्या मूळ किमतीवर भारताला नौदलासाठी राफेल मरीनचा करार करायचा होता.
या करारावरील चर्चेचा पहिला टप्पा जून 2024 मध्ये सुरू झाला. त्यानंतर फ्रेंच सरकार आणि डसॉल्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या करार वाटाघाटी समितीशी चर्चा केली.