नोकरभरतीसाठी सावंतवाडीत गेलेल्या २२ कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा

0
83

बेरोजगारीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी कामगार व रोजगार खाते प्रयत्नरत असून रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेणे बंधनकारक करणारी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. नोकरभरतीसाठी सावंतवाडी येथे गेलेल्या २२ कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली.

राज्यात आयटी स्टार्टअपमुळे सुमारे १५ हजार तर गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या प्रकल्पांद्वारे २५ हजार लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मोप विमानतळावरही गोमंतकीयांना मोठ्या संख्येने रोजगार प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोप परिसरातील सहा गावांना या नोकर्‍यांत प्रथम प्राधान्य देण्यात येईल. नंतर पेडणे तालुक्यातील व त्यानंतर गोव्यातील लोकांना प्राधान्य देण्यात येईल. मनुष्यबळासाठी ‘कौशल्य अकादमी’ची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार खाते ऑनलाइन

अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुलभ, बिनचूक व्हावी तसेच त्यात पारदर्शकता असावी व मानवी हस्तक्षेप असू नये यासाठी कामगार खात्याने विविध ११ प्रकारचे अर्ज ऑनलाइन करण्याची सेवा सुरू केली असल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली. सर्व प्रकारचे अर्ज ुुु.सेरेपश्रळपश.र्सेीं.ळप वर अर्ज उपलब्ध असतील.