कचरा प्रकल्प ७ दिवसांत हटवा

0
105

>> पणजी मार्केटमधील व्यापार्‍यांची मुदत

पणजी मार्केटमधील कचरा प्रक्रिया प्रकल्प हटविण्यासाठी व्यापारी संघटनेने महानगरपालिका प्रशासनाला सात दिवसांची मुदत काल दिली आहे.
येथील मार्केट संकुलाच्या मागील बाजूला मार्केटमधील ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू आहे. परंतु, या कचरा प्रकल्पात कचर्‍याची योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नसल्याने व्यापारी व खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावे लागत असल्याने व्यापारी संघटनेने काल सकाळी लाक्षणिक निदर्शने केली. महापौर विठ्ठल चोपडेकर, नगरसेवक उदय मडकईकर तसेच मनपा अधिकार्‍यांनी मार्केटमध्ये येऊन निदर्शने करणार्‍या व्यापार्‍यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यापारी संघटनेने कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याची मागणी महापौर चोपडेकर यांच्याकडे केली. कचरा प्रकल्पातील दुर्गंधीमुळे आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागत आहे, अशी तक्रार करण्यात आली.