नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण

0
7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. होलोग्रामचा अचूक प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यावर नेताजींचे थ्रीडी चित्र लावण्यात आले आहे. होलोग्राम पुतळा २८ फूट उंच आणि ग्रॅनाइटचा पुतळा तयार होईपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा तिथे बसवण्यात आला आहे.

भारतमातेचे शूर पुत्र सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश सरकारसमोर अभिमानाने सांगितले होते की, मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही, तर ते लढ्याने मिळवू. त्यांच्या या डिजिटल पुतळ्याची जागा लवकरच भव्य पुतळा उभारला जाणार आहे, असे साकारली जाणार आहे. हा पुतळा स्वातंत्र्याच्या महान नायकाला श्रद्धांजली असेल. तसेच, हा पुतळा आपल्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी यावेळी म्हणाले.