नुवे येथील चोरीप्रकरणी  तपासकामात प्रगती नाही

0
98

नुवे येथील राज गोम्स यांच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यात तपास लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. राज गोम्स व त्याच्या पत्नी इझाबेला गोम्स यांच्यावर दरोडेखोरांनी दंडुक्यानी डोक्यावर प्रहार केल्याने ती दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी इस्पितळात उपचार चालू आहेत. राज गोम्सवर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. राज व इझाबेला बोलत नसल्याने पोलिसांच्या तपासकार्यात अडथळा निर्माण झाला आहे. यात कोणत्या वस्तु चोरल्या गेल्या याची माहिती मिळू शकली नाही. मंगळवारी पहाटे तीन वाजता स्वयंपाक घरातील खिडकीची ग्रील्स कापून चोरटे आत घुसले होते. राज गोम्स यानी विरोध केल्याने त्यांच्यावर चोरट्यांनी दंडुक्याने प्राणघातक हल्ला केला.