निळकंठ हळर्णकरांचा राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा

0
60

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष निळकंठ हळर्णकर यांनी काल पदाचा राजीनामा दिला. ते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ते म्हणाले की, आपण फक्त अध्यक्षदाचा राजीनामा दिलेला असून पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला नाही.कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचेही ते या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले. आपण थिवी मतदारसंघात काम करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पक्षाचा अध्यक्ष असल्याने ते काम करता येत नव्हते. म्हणून शेवटी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे हळर्णकर म्हणाले.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांना राजीनाम्याचे पत्र शुक्रवारीच पाठवल्याचे ते म्हणाले.