केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करताना असांसदीय वर्तणूक केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांनी काल सभागृह सोडण्यास नकार दिल्याने काल राज्यसभेत गोंधळ झाला. शेवटी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे भाग पडले.