नाशिकमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या बीपीओमधील महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग, मानसिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत, तर एकूण आठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यात सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या नऊ एफआयआरपैकी दानिश शेखवर बलात्काराचा आरोप आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या प्रकरणाची कंपनीअंतर्गत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले.