Home बातम्या नारायण राणेंकडून नव्या पक्षाची घोषणा

नारायण राणेंकडून नव्या पक्षाची घोषणा

0

घटस्थापनेच्या मुहूर्तावर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणे यांनी काल ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नव्या पक्षाची घोषणा केली. दरम्यान, नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांना एनडीएत सहभागी होण्याचे आमंत्रण भाजपने दिले आहे.
कॉंग्रेस सोडल्यानंतर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवीन पक्ष सुरू करणे असे दोन पर्याय आपल्यासमोर होते. त्यातील दुसरा पर्याय आपण निवडला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका करत बुलेट ट्रेनचे जोरदार समर्थन केले. आपल्या नव्या पक्षाचे ब्रिद वाक्य ‘देऊ शब्द तो पुरा करू’ असे असल्याचे राणे यांनी जाहीर केले. सर्वसामान्य माणसांसोबत आपला पक्ष असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाचे आश्‍वासन दिले होते याची परत एकदा त्यांनी आठवण करून दिली.