नाटो सदस्यत्वाचा आग्रह युक्रेनने सोडला

0
15

रशिया आणि युक्रेनमध्ये सलग १४ व्या दिवशी युद्ध असून, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पश्चिमी देशांकडून अपेक्षित मदत न मिळाल्यानंतर ‘नाटो’ सदस्यत्वासंदर्भात काल एक महत्त्वाचे विधान केले. मी चर्चेसाठी तयार आहे. नाटो आम्हाला स्वीकार करण्यास तयार नाही, हे आमच्या लक्षात आल्यानंतर खूप अगोदरपासूनच हा प्रश्न आपण मागे टाकला आहे. आपण यापुढे युक्रेनच्या नाटो सदस्यत्वासाठी दबाव आणणार नाही, असे झेलेन्स्की म्हणाले. दरम्यान, काल युक्रेनमधील विविध शहरातील २२ नागरिक रशियन हल्ल्यात ठार झाले.