राज्य नागरी सेवेतील १४ अधिकार्यांच्या बदल्यांचा आदेश काल जारी केला. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकर यांची बदली करण्यात आली असून माहिती खात्याच्या संचालकपदी दीपक बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विकास गावणेकर यांची अतिरिक्त सचिव (आरोग्य), अजित पावसकर यांची शिष्टाचार खात्याचे संयुक्त सचिव, अमरसेन राणे यांची राज्यपालांचे अतिरिक्त सचिव, जयंत तारी यांची मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी, संध्या कामत यांची अतिरिक्त सचिव (गृह), अरविंद खुटकर यांची सहकार निबंधक म्हणून आणि गोवा राज्य एसटी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा, मेघनाथ परब यांची रवींद्र भवनाच्या सदस्य सचिव, प्रसन्न आचार्य यांची राजभाषा संचालक, श्रीनेत कोठवाळे यांची व्यवस्थापकीय संचालक – स्मार्ट सिटी, गौरीश शंखवाळकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी – उत्तर गोवा जिल्हा पंचायत, श्रीमती इरेन सिक्वेरा यांची सचिव – राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, श्रीमती लॉरा ब्रिटो यांची सचिव – गोवा पुनर्वसन मंडळ, श्रीमती शर्मिला जुआर्त यांची गोवा कोकणी अकादमीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.