नाईकवाडा-कळंगुट येथे नेपाळी महिलेचा मृत्यू

0
77

नाईकावाडा-कळंगुट येथील अंतर्गत रस्त्यावर बुधवार दि. १७ रोजी सकाळी पावणे सातच्या दरम्यान एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह कळंगुट पोलिसांना सापडला. त्यामुळे या भागात खळबळ उडाली. दरम्यान, मूळ नेपाळी असलेल्या या महिलेचा ६ वर्षांपूर्वी गोव्यात विवाह झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला आहे.
नाईकावाड्याकडे जाणार्‍या रस्त्यावर अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती कळंगुट पोलिसांना देताच निरीक्षक जिवबा दळवी यांनी सहकार्‍यां समवेत घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. यावेळी तिच्याजवळ सापडलेल्या मोबाईलवरून तिचे नाव रिचा डिसोझा असल्याचे समजले. त्याचप्रमाणे तिच्या नवर्‍याशी संपर्क साधण्यात पोलिसांना यश आले.
२०११ साली मूळ नेपाळी असलेल्या रिचा हिचा विवाह स्थानिक विन्सी डिसोझा यांच्याशी झाला होता. लग्नाच्या सात वर्षांच्या आत रिचाचा मृत्यू झाल्याने या घटनेची चौकशी दंडाधिकार्‍यांमार्ङ्गत करण्यात येणार आहे. रिचाच्या नेपाळमधील आईवडिलांशी संपर्क साधण्याचा कळंगुट पोलीस प्रयत्न करीत आहेत. या घटनेची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.