नव्या ७५७ रुग्णांसह पाच मृत्यू

0
152

>> कोरोनाचे राज्यात थैमान; मडगाव, पर्वरीत रुग्णसंख्या वाढली

कोरोना रुग्णांच्या संख्येने नवीन उच्चांक गाठला आहे. नवे ७५७ बाधित रुग्ण सापडले असून पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २७.९२ टक्क्यांवर पोहोचले असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५६८२ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ८६२ झाली आहे.

राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सततची वाढ कायम आहे. इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. मागील तीन दिवसांत नवीन ३७२ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.

मडगावात ६६० तर
पर्वरीत ५५८ रुग्ण

मडगावातील सध्याच्या रुग्णांची संख्येने साडेसहाशेेचा टप्पा पार केला असून रूग्णसंख्या ६६० एवढी झाली आहे. पर्वरी परिसरातील रुग्णसंख्येने साडेपाचशेचा टप्पा पार केला असून रुग्ण संख्या ५५८ झाली आहे. म्हापसा येथील रूग्णसंख्या ४०१, पणजीतील रुग्णसंख्या ३९८, फोंड्यातील रुग्णसंख्या ३८०, कांदोळी येथील रूग्णसंख्या ३२१ एवढी आहे. वास्को, कुठ्ठाळी, शिवोली, खोर्ली, चिंबल, साखळी, डिचोली, पेडणे आदी भागात रूग्णसंख्या वाढत आहे. वास्कोत २७१, कुठ्ठाळी येथे २८४, शिवोलीत १६४, कासावली येथे १७४ रुग्ण, खोर्ली १३७, चिंबल २०४, साखळीत १२४ रुग्ण, डिचोली १३४, पेडणे १३४ रुग्ण, हळदोणा ११६ रुग्ण, चिंचिणी ११० रुग्ण, शिरोडा १०२ रुग्ण आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६४ हजार ५७२ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १८२ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ०२८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८७ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ३६७ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. चोवीस तासांत २७११ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २७.९२ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत. तर २१ प्रवासी बाधित आढळून आले आहेत.

काणकोण ९८ रुग्ण, कुडचडे ९४ रुग्ण, नावेली ८९, कुडतरी ८९ रुग्ण, लोटली ८९ रुग्ण, सांगे ८७ रुग्ण, कोलवाळ ८६ रुग्ण, वाळपई ६० रुग्ण, धारबांदोडा ५८ रुग्ण,बाळ्ळी ५४ रुग्ण, बेतकी ५२ रुग्ण, मडकई ४६ रुग्ण, केपे ३६ रुग्ण तर मये आरोग्यकेंद्रात सध्या ३२ रुग्ण आहेत.

एप्रिलमध्ये १५ दिवसांत ६५३३ रुग्ण
एप्रिल महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत नवे ६५३३ रुग्ण आढळून आले असून ३२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याच्या टक्केवारीतही वाढ होत आहे. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट होत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८७ टक्क्यांवर आले आहे. ३१ मार्चला कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८९ टक्के एवढे होते.

पाचजणांचा मृत्यू
राज्यात चोवीस तासांत ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन कोरोना रुग्णांना मृतावस्थेत मडगाव येथील हॉस्पिसीयू इस्पितळात आणण्यात आले. गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना कुंकळ्ळी येथील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा केवळ सहा तासांत मृत्यू झाला. फोंडा येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्ण, नेरूल येथील ३७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. मडगाव येथील ९४ वर्षीय पुरुष रुग्ण आणि घोगळ मडगाव येथील ७४ वर्षीय पुरुष रुग्णाला मृतावस्थेत हॉस्पिसीयू इस्पितळात आणण्यात आले होते अशी माहिती आरोग्य खात्याने दैनंदिन अहवालात दिली आहे.