रेडेघाटी – वाळपईतील अपघातात युवकाचा मृत्यू

0
149

रेडेघाटी वाळपई येथे काल गुरूवारी सकाळी झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात दत्तप्रसाद गांवकर (१९) या सालेली सत्तरीतील युवकाचा मृत्यू झाला. गॅस सिलिंडरचे वाहन, ऍक्टिवा व स्प्लेंडर मोटारसायकल अशा तीन वाहनांत हा अपघात झाला.

दत्तप्रसाद हा सकाळी साडेनऊच्या सुमारास ऍक्टिवाने वाळपईला येत होता. तर वाळपईहून होंडाला स्प्लेंडर मोटारसायकल जात होती. समोरून येणार्‍या सिलिंडरच्या गाडीला स्प्लेंडर चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. खड्डा चुकवण्यासाठी स्प्लेंडर जरा बाजूला घेत असताना त्याने सिलिंडरच्या गाडीला धडक दिली. यावेळी ऍक्टिवानेही सिलिंडरच्या गाडीला धडक दिली. यात सिलिंडरची गाडी पलटी झाली.

या घटनेत ऍक्टिवा चालक दत्तप्रसाद हा गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित गोमेकॉत दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर स्प्लेंडरचालक किरकोळ जखमी झाला. वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.