नवे कोरोना रुग्ण १००च्या खाली

0
51

राज्यात चोवीस तासांत शंभरपेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यू नोंद नाही. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात नवे ९९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या १४३६ एवढी झाली आहे. राज्यात एकूण ३१११ कोरोना बळींची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत १३ जणांना इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,६९,८३९ एवढी झाली आहे.
राज्यात काल आणखी २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १,६५,२९२ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७,३२ टक्के एवढे आहे. राज्यात नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३.०२ एवढे आहे.