Home बातम्या नवीन 16 कोरोना रुग्ण; 4 जण इस्पितळात दाखल

नवीन 16 कोरोना रुग्ण; 4 जण इस्पितळात दाखल

0

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन 16 कोरोनाबाधित आढळून आले असून, 4 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दीडशेच्या जवळ येऊन ठेपली असून, ती 142 एवढी झाली आहे. राज्यातील नवीन कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 9.5 टक्के एवढे आहे. चोवीस तासांत 168 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच आणखी 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.