नवीन २८ कोरोना रुग्णांमुळे सध्याची कोरोना रुग्णसंख्या ३२०

0
162

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह नवीन २८ रुग्ण काल आढळून आले आहेत. त्यात २४ पॉझिटिव्ह रुग्ण मांगूर हिलशी संबंधित आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सध्याच्या रुग्णांची संख्या ३२० झाली आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ३८७ झाली असून त्यातील ६७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.

जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित १० रुग्णांना काल दाखल करण्यात आले. कोरोना आयझोलेशन वॉर्डात कोरोना संशयित १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत २०४९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतून १५७४ नमुन्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. १५६४ नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १५४६ नमुने निगेटिव्ह आहेत. तर २८ नमुने पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

ताळगावात सापडला १ पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण
ताळगावमध्ये एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सदर व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, ताळगाव भागातील ९० जणांच्या स्वॅबचे नमुने काल घेण्यात आले आहेत, अशी माहिती ताळगावचे सरपंच आग्नेल दा कुन्हा यांनी काल दिली.