नववर्षाच्या स्वागतासाठी देशी पर्यटकांचा लोंढा

0
15

>> नववर्षाच्या स्वागतासाठी देशी पर्यटकांचा लोंढा

>> ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाले आहेत. देशातील काही राज्यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, गोव्यात कोरोनाबाधिताची संख्या वाढत असली तरी कडक नियमावली जाहीर करण्यात आली नाही.

राज्यातील समुद्रकिनार्‍यांवर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. गोव्यात कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी पर्यटक बिनधास्तपणे समुद्रकिनार्‍यावर फिरताना दिसत होते. सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात होते.

राज्यातील किनारी व इतर भागातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

देशी पर्यटक चारचाकी वाहने घेऊन येत असल्याने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
बांबोळी ते गोवा वेल्हा दरम्यानच्या उड्डाण पुलाचा एक मार्ग वाहतुकीसाठी काल खुला करण्यात आला आहे. पर्वरी, कुठ्ठाळी परिसरात वाहतूक कोंडी होत होती. पणजी शहरात वाढलेल्या वाहनांमुळे पार्किंगचीही समस्या निर्माण झाली होती.