नवख्या चेहर्‍यांच्या खेळाडूंचे नेतृत्व करण्यासाठी धोनी उत्सुक

0
95

>>टीम इंडिया झिम्बाब्वे दौर्‍यावर रवाना

 

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ११ जूनपासून सुरू होणार्‍या झिम्बाब्वे दौर्‍यातील दुय्यम दर्जाच्या संघातील वेगळ्या खेळाडूंबरोबर काम करण्याच्या आव्हानाबाबत उत्सुक असल्याचे सांगितले. या दौर्‍यात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विनसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या गैरहजेरीत धोनी नवख्या चेहर्‍यांचा समावेश असलेल्या खेळाडूंचे नेतृत्व करणार आहे.
झिम्बाब्वेला रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला की, मला वाटते की हा माझ्यासाठी खरोखरच वेगळा अनुभव असेल. कारण आपण काही ठराविक खेळाडूंसमवेत कायम खेळत आलेलो असतो तेव्हा आपल्याला आपल्या जबाबदारीची माहिती असते. परंतु या द्विपक्षीय मालिकेत बरेच असे खेळाडू आहेत ज्यांच्या सोबत आपण प्रथमच खेळणार आहे. त्यामुळे मला लवकरच त्यांची मजबूत बाजू कोणती आह हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्याच बरोबर संघ संयोजन पाहता कोणत्या खेळाडूला कोणत्या स्थानी उतरवायचे हेही ठरविणे गरजेचे आहे. संयोजन तसेच हा संघही निश्‍चितच चांगला आहे, असे धोनी म्हणाला.
भारतीय संघ ११ ते २२ जूनपर्यंच्या या दौर्‍यात तीन वन-डे आणि तेवढ्याच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. सर्व सामने हरारेत खेळविले जातील.
धोनीच्या मते नाणेफेक महत्त्वाची भूमिका निभावेल, कारण सर्व सामने दिवसा खेळविले जाणार आहेत. जर आपण दिवसाचे सामने खेळणार असाल तर नाणेफक महत्त्वाची भूमिका निभावते. कारण तुम्हाला परिस्थिताच लाभ उठवायचा असतो. या दौर्‍यातील संघात फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजीत जास्त आंतरराष्ट्रीय अनुभवाचे खेळाडू आहेत असे धोनी म्हणाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तुलना आपण इंडियन प्रीमियर लीगशी करू शकत नाही, असेही धोनी स्पष्ट केले.

कर्णधार कोण असावा तो निर्णय सर्वस्वी बीसीसीआयचा
दरम्यान, आपण सध्या खेळाची मजा लुटत असून कर्णधारपद हा सर्वस्वी बीसीसीआयचा निर्णय आहे, असे महेंद्रसिंह धोनीने एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले. टीम इंडियाचे माची तांत्रिक संचालक रवी शास्त्री यांनी धोनीला खेळाचा आनंद लुटता यावा यासाठी विराट कोहलीकडे वन-डे, कसोटी आणि टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोपवावे असे वक्तव्य केले होते आणि त्यासंदर्भात पत्रकांनी धोनीला छेडले असता वरील उत्तर धोनीने दिले. असे नाही की आपण खेळाचा आनंद लुटत नाही आहे. परंतु कर्णधार कोण बनावा हा सर्वस्वी बीसीसीआयचा निर्णय आहे. आपण त्यासंदर्भात काही बोलू शकत नाही, असे धोनी म्हणाला. सध्या माझे वय ३५ झालेले आहे, परंतु तंदुरुस्त ही माझ्यासाठी कोणतीही समस्या नाही आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकासंदर्भात बोलताना धोनी म्हणाला की, भाषा खेळाच्या आड येता कामा नये. परंतु भाषेच्या पलिकडे जाऊन येथील खेळाडूंची संस्कृती प्रशिक्षकांना ओळखता येणे गरजेचे आहे. तरच ते योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊ शकतील असे त्याने सांगितले. यापूर्वीच्या ज्या प्रशिक्षकांना खेळाडूंना चांगले ओळखले तेच प्रशिक्षक संघासोबत चांगले काम करू शकले, असेही त्याने सांगितले.