त्रिपुरात कॉंग्रेसच्या सहा आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश

0
86

यांपाठोपाठ आता त्रिपुरामध्येही कॉंग्रेस पक्षात बंडखोरी झाल्यामुळे कॉंग्रेसला हादरवणारे त्रिपुरा हे ईशान्येकडील चौथे राज्य ठरले आहे. त्रिपुराच्या सहा आमदारांनी आता कॉंग्रेसचा त्याग करून तृणमूल कॉंग्रेसशी संधान बांधले आहे.

डाव्यांची सत्ता असलेल्या त्रिपुरात आता बंडखोर कॉंग्रेस आमदार गट व तृणमूल कॉंग्रेस हा संयुक्त प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. कॉंग्रेसचा त्याग करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे पत्र बंडखोर आमदारांचे नेते सुदिप रॉय बर्मन यांनी विधानसभा सभापती रामेंद्र देवनाथ यांना सादर केले. यावेळी त्यांचे अन्य पाच आमदारही उपस्थित होते.