संगणक अभियंता असलेल्या नयना अभिजित पुजारी या तरुणीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने काल तिन्ही आरोपींना ङ्गाशी सुनावली. शहराला हादरवून सोडणार्या या अमानुष प्रकरणाचा निकाल लागण्यास सात वर्षे लागली. सत्र न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांनी योगेश राऊत, महेश ठाकूर व विश्वास कदम या आरोपींना ङ्गाशी ठोठावली. या प्रकरणातील एक संशयित राजेश चौधरी याची माङ्गीचा साक्षीदार म्हणून सुटका करण्यात आली.
या खटल्यात सरकारतर्ङ्गे विशेष वकील हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणात ३७ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. काल उभय पक्षकारांचे युक्तीवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी आपला निवाडा जाहीर केला.
वरील आरोपींना भा.दं.सं.च्या कलम १२० (कट रचणे), ३६६ (अपहरण), ३७६ (सामूहिक बलात्कार), ३०२ (खून), ३९७ (जबरी चोरी), मृतदेहावरील वस्तू चोरी (४०४) अशा कलमांखाली न्यायालयाने दोषी ठरविले.
न्यायालयाचे कामकाज सुरू होण्याच्या तासभर आधीच आरोपींना न्यायालयात आणण्यात आले. शिक्षा जाहीर करण्याआधी न्यायालयाने आरोपींना म्हणणे मांडण्याची संधी दिली. यावेळी योगेश राऊत याने या गुन्ह्यात आपल्याला अडकविण्यात आल्याचा कांगावा केला.
आपण गुन्हा केलेला नाही असे त्याने सांगितले. आपल्याला पत्नी, मुले व आई असून ही बाब लक्षात घ्यावी असे तो म्हणाला. माङ्गीचा साक्षीदार राजेश चौधरीही या गुन्ह्यात सामील असल्याने त्यालाही शिक्षा व्हायला हवी अशी मागणी योगेश राऊत व विश्वास कदम यांनी केली. यावेळी न्यायाधीशांनी तिसरा आरोपी महेश ठाकूर यालाही विचारणा केली. मात्र त्याने बोलण्यास नकार दिला. संगणक अभियंता असलेली नयना पुजारी काम संपवून रात्री घरी जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या असताना तिला घरी सोडण्याची कारचालक योगेश राऊत याने तयारी दर्शविली. कारमध्ये बसल्यानंतर तिला निर्जन ठिकाणी नेऊन तीन मित्रांसह तिच्यावर
सामूहिक बलात्कार करून खून केला.