दिल्ली विधानसभेत इव्हीएम हॅकिंग प्रात्यक्षिक

0
93

>> ‘ते’ इव्हीएम डमी असल्याचा आयोगाचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून राजधानीत खळबळ उडाली असली तरी काल जीएसटी विधेयकासाठीच्या एका दिवसाच्या विधानसभा अधिवेशनात या आरोपांना उत्तर देण्याचे टाळण्यात आले. मात्र सत्ताधारी आमदार सौरभ भारद्वाज यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन तथा इव्हीएममध्ये सहजतेने छेडछाड करणे शक्य असल्याचे प्रत्यक्ष सादरीकरण सभागृहात करून दाखविले. यामुळे विरोधी भाजपने आम आदमी पक्षाविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण केले आहे की दिल्ली विधानसभेत प्रात्यक्षिक केलेले इव्हीएम हे आयोगाकडून वापरले जाणारे इव्हीएम नाही.
निवडणूक आयोगाच्या वरील स्पष्टीकरणानंतर ‘आप’ने आपणास निवडणूक आयोगातर्ङ्गे वापरले जाणारे इव्हीएम द्यावे आपण ते सहजपणे हॅक करून दाखवतो, असे आव्हान दिले आहे. ‘आप’चे सर्वेसर्वा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर इव्हीएम अवघ्या ९० सेकंदात हॅक केले जाऊ शकते असा दावा विधानसभा अधिवेशनानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
सॉफ्टवेअर अभियंता असलेले आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी सभागृहात इव्हीएम मशीन आणून ते सहजपणे कसे हॅक केले जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार एखादा जाणकार मतदारही इव्हीएममध्ये गुप्त कोड टाकू शकतो. प्रत्येक पक्षाचा कोड असतो आणि जेव्हा तो कोड इव्हीएममध्ये टाकला जातो तेव्हा नोंद झालेली सर्व मते त्या एकाच पक्षाला जातील. आपला दावा त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे टप्प्याटप्प्याने सिद्ध करून दाखविला. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अन्य सर्व पक्षांची धूळदाण उडाल्यानंतर बसपा, कॉंग्रेस, आप, सपा व भाकप या पक्षांनी त्याला इव्हीएमची बनवेगिरी कारण असल्याचा आरोप केला होता.
इव्हीएममधील बनवेगिरीमुळे प्रत्यक्ष होणार्‍या मतदानाऐवजी वेगळाच निकाल लागत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आपण या क्षेत्रात दहा वर्षे असून आपला वरील दावा कोणाही शास्त्रज्ञाने खोडून काढावा असे आव्हान त्यांनी दिले. इव्हीएमचा मदरबोर्ड बदलला की छेडछाड सहज करता येते. अशा मशीनचा वापर चालू राहिल्यास लोकशाहीला धोका असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने भारद्वाज यांचा दावा ङ्गेटाळून लावला आहे. भारद्वाज यांनी प्रात्यक्षिक केलेले इव्हीएम आयोगाचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारद्वाज यांनी वापरलेले इव्हीएम हे डमी असल्याचे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने याआधी अनेकदा अशा प्रकारचे दावे ङ्गेटाळले आहेत. निवडणूक आयोगाने एका सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले असून त्यात कोणीही इव्हीएमची बनवेगिरी सिद्ध करून दाखवावे असे आयोगाने आव्हान दिले आहे. ते स्वीकारण्याची तयारी आम आदमी पक्षाने तयारी दाखविली आहे.