धारगळ येथे उभारणार भव्य क्रिकेट स्टेडियम

0
97

>> क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांची विधानसभेत माहिती

धारगळ पेडणे येथे ५० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेला क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे, अशी माहिती क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत काल दिली.
डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांच्या राज्यात सुसज्ज क्रिकेट स्टेडियम बांधण्याच्या खासगी ठरावावर बोलताना क्रीडामंत्री आजगावकर यांनी वरील माहिती दिली. राज्यात सुसज्ज क्रिकेट मैदानाची आवश्यकता आहे. दक्षिण गोव्यात एक भव्य स्टेडियम आहे. सरकारचा क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव आहे का ? असा प्रश्‍न आमदार पाटणेकर यांनी उपस्थित केला.

त्यावर बोलताना क्रीडामंत्री आजगावकर म्हणाले की, सरकारचा धारगळ पेडणे येथे सुसज्ज क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव आहे. धारगळ येथे क्रीडानगरीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या जागेपैकी २ लाख चौरस मीटर जागा क्रिकेट मैदानासाठी दिली जाणार आहे.
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा स्टेडियम उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी क्रिकेट स्टेडियमसाठी जमीन देण्यासाठी मान्यता दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन जमीन गोवा क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द केली जाणार आहे. क्रिकेट स्टेडियमसाठी लीज पध्दतीने जमीन दिली जाणार आहे, असेही मंत्री आजगावकर यांनी सांगितले.