दोन दुचाकींच्या टक्करीत तुयेत एक ठार

0
81

तुये हॉस्पिटल परिसरात २८ रोजी दुपारी दोन दुचाकी वाहनांमध्ये अपघात होवून मोटारसायकल चालक दिगंबर आबू नाईक (४८ भोमवाडा तुये) हा जागीच ठार झाला.जीए ११ सी २२१८ या मोटरसायकलने देवेंद्र साळगावकर पेडणे मार्गे तुयेला जात होते तर त्याच्या मागून पल्सर जी ए ११ बी १२६९ या मोटारसायकल वरून दिगंबर नाईक जात होता. त्याने पुढच्या वाहनाला जबरदस्त धक्का दिला. दिगंबर रस्त्यावर पडून डोक्याला जबर मार लागला जवळच्या तुये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेत असतानाच त्याचे वाटेत निधन झाले. देवेंद्र साळगावकर किरकोळ जखमी झाला. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह बांबोळी येथे पाठवण्यात आला.