काल दुपारी नागवा जंक्शन जवळ दोन दुचाकीमध्ये समोरा समोर अपघात होऊन फिलीप डेव्हीड (४२) हा ब्रिटीश नागरिक जागीच ठार झाला. हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत फिलीप डेव्हीड हा आपल्या जीए ०३ ई ३३५५ चा बजाज एव्हीअर वरून हडफडेहून हणजूण येथे जात होता.
जोहनस हा विदेशी नागरिक त्याच्या विरुध्द दिशेहून जीए ०३ के ५९१० या डिओ स्कूटरवरून येत होता या दोन्ही वाहनात समोरसमोर टक्कर झाली यात फिलीप डेव्हीड हा जागीच ठार झाला. एव्हीअर हा विदेशी नागरिक जखमी झाला.