देशात गुरूवारी कोरोनाचे नवे ५१,६६६ बाधित

0
38

देशात गुरूवारी चोवीस तासांत कोरोनाची बाधा झालेले ५१,६६६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या एक आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ही ६,१२,००० पर्यंत खाली आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५३१ जिल्ह्यांमध्ये रोज १०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात २६२ जिल्ह्यांत १०० पेक्षा कमी रुग्ण आढळून येऊ लागले.

देशाचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढला आहे. देशात आतापर्यंत ३१,१३,१८,३५५ जणांना कोरोनावरील लशीचा डोस देण्यात आला आहे. गेल्या काही तासांत ३४ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनावरील लशीचा डोस देण्यात आला आहे.

आतापर्यंत भारतात तीन कोटी ३ लाख ३४ हजार ४४५ रुग्ण आढळले आहेत. यापैकी दोन कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६ लाख १२ हजार ८६८ रुग्णांनी कोरोनावर उपचार सुरू आहेत. तसेच ३ लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.