रेमडेसिवीर या कोरोनावरील उपचारासाठी महत्त्वाच्या औषधाचा देशात अनेक ठिकाणी तुटवडा भासत आहे. त्यामुळे आता भारतातील रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन वेगाने वाढवले असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. मंत्री मांडवीय यांनी देशातील रेमडेसिवीरच्या उत्पादनाने वेग घेतला असून आता तिप्पट उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे देशातली वाढती मागणी पूर्ण करता येणार असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वीच सरकारने रेमडेसिवीरच्या कुप्या इतर देशांतून आयात करण्याचे ठरवले आहे. यातील ७५ हजार कुप्या शुक्रवारी पोहोचणार आहेत.