देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही ः राजनाथ

0
180

शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय जवान सक्षम असून भारत आपल्या देशाच्या अखंडतेबाबत अजिबात तडजोड करणार नाही. देशाच्या अखंडतेसाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल बेंगळुरू येथे केले. बेंगळुरू येथे एरो-इंडिया २०२१ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजनाथ यांनी संरक्षण क्षेत्रातील आर्थिक बाबींवरही भाष्य केले. भारतीय सैन्याचे बळ वाढवणे व सैन्यांसाठी आवश्यक वस्तू भारतात अधिकाधिक तयार करण्यावर सध्या भर देण्यात येत असल्याचे राजनाथ म्हणाले.