मोले-धारबांदोड्यात उद्या पक्षी महोत्सव

0
184

>> गोवा वनखात्यातर्फे तीन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन

गोवा वन खाते उद्या शुक्रवार दि. ५ फेब्रुवारीपासून मोले-धारबांदोडा येथे चौथ्या पक्षी महोत्सवाचे आयोजन करणार आहे. हा महोत्सव ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
या पक्षी महोत्सवात गोव्यासह अन्य विविध राज्यांतील मिळून सुमारे १०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या महोत्सवानिमित्त मार्गदर्शनासह पक्षी टुर्स, पक्षी तज्ज्ञांची व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अन्य आकर्षक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दि. ५ रोजी सकाळी १० वा. मोले येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर हे सन्माननीय अतिथी म्हणून हजर राहणार आहेत. या पक्षी महोत्सवानिमित्त वन व पर्यावरण संवर्धनासंबंधी लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी आज ४ रोजी एक जागृती फेरी केपे नगरपालिकेकडून मोले अशी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या जागृती फेरीला हिरवा कंदिल दाखवतील असे वन खात्याने कळवले आहे.