देशांतर्गत विमान सेवेस प्रारंभ; मात्र अनेक उड्डाणे झाली रद्द

0
149

तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर देशांतर्गत प्रवासी विमानसेवेस काल प्रारंभ झाला. मात्र देशाच्या विविध भागातील विमानांची उड्डाणे रद्द झाल्याने संबंधित विमानसेवेसाठी तिकिटांचे आरक्षण केलेल्या शेकडो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

विमानतळ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ८० विमानांची उड्डाणे रद्द झाली त्याआधी प. बंगाल, महाराष्ट्र व चेन्नईसह सर्व विमानतळांवरील उड्डाणांचे वेळापत्रक प्रसिध्द झाले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. चेन्नईतील ३४ पैकी १५ उड्डाणे रद्द झाली.

बंगळुरु विमानतळावर एकट्यानेच
उतरला चिमुकला प्रवासी
बंगळुरुतील केम्पेगौडा विमानतळावरील कालच्या दिवसाचे एक ठळक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे दिल्लीहून आलेल्या विमानाने तेथे उतरलेला एक चिमुकला प्रवासी. विहान शर्मा हा ५ वर्षीय मुलगा एकटाच दिल्लीहून विमानाने तेथे उतरला. गेल्या तीन महिन्यांपासून त्याची आई वाट पाहत होती. विहानला घेऊन जाण्यासाठी ती विमानळावर आली होती.