देशभरात आढळले ८२ रुग्ण आता धोका ‘टोमॅटो फ्लू’चा

0
21

कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका कायम असतानाच आता टोमॅटो फ्लूचाही धोका वाढलेला आहे. लहान मुलांमध्ये हा आजार वेगाने पसरत असून टोमॅटो फ्लूचे केरळसह कर्नाटक, तामिळनाडू आणि ओरिसामध्येही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करत लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत ८२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सगळ्यात जास्त लहान मुलांचा सामावेश आहे.