कॉंग्रेस कार्यकारिणीची २८ रोजी नवी दिल्लीत बैठक

0
11

कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक येत्या २८ ऑगस्ट रोजी होणार असून या बैठकीत नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी निवडणुकीच्या तारखांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी देशाबाहेर असल्याने ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या ऑक्टोबरमध्ये कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड होऊ शकेल असे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा ताबा स्वीकारण्यास नकार दिला असल्यामुळे पुढील अध्यक्ष कोण होणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष होण्याचे आवाहन केले आहे. अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, मीरा कुमार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.