देशपातळीवर चोवीस तासांत ५६१ जणांचा कोरोनाने मृत्यू

0
26

देशात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत तसेच मृत्यूंच्याही संख्येत झपाट्याने घट होत आहे. देशात गेल्या २४ तासांत १५ हजार ९०६ कोरोनाबाधित आढळले तर ५६१ रुग्णाचा मृत्यू झाला. देशातील रिकव्हरी रेट ९८.१७ टक्के झाला आहे. हा दर मार्च २०२० म्हणजे तब्बल दीड वर्षानंतरचा सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत देशात १६ हजार ४७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या देशात १ लाख ७२ हजार ५९४ सक्रिय रुग्ण आहेत. नवीन रुग्णसंख्येसह देशातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ३ कोटी ४१ लाख ७५ हजार ४६८ झाली आहेत. तर, आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख ४८ हजार ६०५ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासांत ७७ लाख ४० हजार ६७६ जणांचे लसीकरण झाले असून आतापर्यंत देशातील १०२.१० कोटी लशीचे डोस पूर्ण झाले आहेत.