दुहेरी नागरिकत्व प्रश्नी राज्य सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहे. दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली.
आमदार कार्लूस फेरेरा यांच्या खासगी ठरावावर ते बोलत होते. येत्या 17 किंवा 18 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेऊन गोवा सरकारचा प्रस्ताव सादर करून या प्रश्नी तोडगा काढण्याची विनंती केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर फेरेरा यांनी आपला खासगी ठराव मागे घेतला.